\

my club mahindra holiday membership is close and refund my payment rs.93680

Complain ID : CCN034613   45  

Consumer Complaint Date: November 18, 2020
respected sir
विषय :- क्लब महेंद्रा हॉलिडे मेंबरशीप बंद करून भरलेले पैसे परत मिळणेबाबत..


आदरणीय साहेब,
मी, श्री.नारायण रंगनाथ शिंदे (माजी सैनिक), रा.103 सी विंग, लारा अपार्टमेंट, क्रिकेट ग्राऊंड जवळ, उमरोळी, ता.जि. पालघर येथे रहात असून, क्लब महेंद्रा मेंबरशीप चे सेल्स (मॅनेजर) श्री. निशांत दाभोळकर यांनी मला दि.05.11.2020 रोजी क्लब महेंद्रा हॉलिडे मेंबरशीप बद्दल सांगीतले त्यानुसार मी दि.05.11.2020 रोजी सदर मेंबरशीप साठीचे 30 टक्के रक्कम रु.93680/- इतके श्री. निशांत दाभोळकर (मॅनेजर) यांना दिलेले आहेत.
परंतू माझ्या काही कौटुंबिक कारणांमुळे तसेच पुढील मासिक हप्ता भरण्यासाठी काही अडचणी असल्यामळे मी माझी क्लब महेंद्राची मेंबरशीप बंद करण्यासाठी दि.12.11.2020 रोजी (म्हणजेच 06 दिवसांनी) क्लब महेंद्रा हॉलीडे मेंबरशीप कंपनीला मेल करुन कळविलेले आहे. त्यानंतर क्लब महेंद्रा हॉलिडेचे मेंबरशीप कंपनीच्या कॅन्सलेशन डिपार्टमेंटचे श्री.गंगेश्वर पुरी यांनी (मोबाइलवर कॉल करून) मला सांगीतले की, आपली मेंबरशीप बंद केली तर आपणास पैसे परत मिळणार नाहीत.
आदरणी साहेब मी एक माजी सैनिक असून मी भारतीय सैन्यदलामध्ये मागील 18 वर्षे अनेक असंवेदनशिल क्षेत्रात कर्तव्य पारपाडलेले असून, माझ्या बचतीमधील पैश्यातूनच मी मेंबरशपसाठी रु.93680/- इतके पैसे भरलेले असून मी सदर मेंबरशीपचा कोणताही लाभ घेतलेला नाही. परंतू इतके पैसे अडकल्यामुळे मी आणि माझे कुटूंब खूपचमानसीक तनावामध्ये आहे. तरी मला सदरची मेंबरशीप बंद करुन मी भरलेले रु.93680/- हे पैसे परत करण्याबाबत आपण संबंधित क्लब महेंद्रा हॉलिडे कंपणीस आदेश दयावेत ही नम्र विनंती आहे. आपले सहकार्यासाठी मी आणि माझे कुटूंब सदैव आपले त्रृणी राहाणार.....
क्लब महेंद्रा हॉलिडे मेंबरशीप नं.- 2929836
मी पैसे भरलेबाबतची क्लब महेंद्राची पावती क्र.-760444178 (दि.07.11.2020)

(नारायण रंगनाथ शिंदे)
(माजी सैनिक)
Complaint Against : club mahindra holiday

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    Write your Consumer Complaints at forum, talk to members having similar complaints. Consumer Court, Consumer Complaint, Help to file Consumer Complaint Court, Address of Consumer Courts, Complaint against mobile phone service Online Consumer Complaint, Complaint against government department How to trap a bribe seeker Complaint.