providing new passanger train from diva to vasai via kopar at morning around 9 am.

Complain ID : CCN057481   50  

Railway Complaint Complaint Date: April 29, 2022
प्रति ,
मा .केंद्रीय मंत्री .व कल्याण भिवंडी मतदार संघाचे व आमचे लाडके नेते श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब.
Anjur-Dive, P.O. Anjur, Tal. Bhiwandi,
Thane-421302, Maharashtra


विषय :- अतिरिक्त दिवा - वसई पेसेंजर गाडी .सकाळी ९ च्या सुमारास सुरु करणे बाबत .

संधर्भ :-
वरील विषयास अनुसरून आपणास कडविण्यात येतो कि ,
महोदय ,
वरील विषयास अनुसरून मुंबई अंतर्गत कल्याण ते ठाणे दरम्यान कोपर -दिवा स्टेशन आहे .कल्याण डोंबिवली दिवा या भागातून हजारो लोक भिवंडी व वसई येथे कामाला जातात व आपला उदरनिर्वाह करतात .
या लोकांसाठी जाण्या येण्या साठी सर्वात सोईस्कर मार्ग म्हणजे आपली रेल्वे आणि दिवा - वसई पेसेंजर ट्रेन आहे
दिवा डोंबिवली कोपर वरून सकाळी ५.५८ ला वसई ला जाणारी गाडी आहे .त्यानंतर तब्बल ४ तास २० मिनिटाने म्हणजे सकाळी १०.१७ वाजता दुसरी गाडी आहे .
महोदय कामावर जाण्याची वेड सकाळची असून १० पर्यंत कामावर पोहचण्याची वेड असते .पण ते ह्या १०.१७ वाजता सकाळच्या गाडी ने शक्य होत नाही .हि गाडी वेडेवर आली तर ११.१० वाजता वसई ला पोहचते. पण कधी कधी हि गाडी उशिरा असते .मग तर काही विचाराची सोय नाय . आपल्या गंतव्य जागी पोहचणे साठी आणखी १५-२० मिनटे लागतात .त्यामुडे आपली कामे पूर्ण होत नाही .मेहनताना पूर्ण मिडू शकत नाही . अर्ध्या पगारावर उदरनिर्वाह करावं लागतो .तसाच नोकरी करणारा वर्ग हि या गाडीत असतो त्यांना पण रोज बोलणे खावे लागतो . मग उशिरा पर्यंत बसून आपले कामे करावे लागतो .
व त्यामुडे शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो .
तसेच लोकल चा विचार केल्यास , कल्याण ते वसई वाया दादर जावे लागते आणि त्यासाठी ३ तास लागतात ते हि मरणाच्या गर्दीत ! त्यामुडे लोकल चा विचार आणखी कठीण आहे .
मागे लॉक डाउन च्या कांडात कल्याण वरून ८ वाजता वसई ला जाणारी पेसेंजर गाडी होती . पण ती लॉक डाउन संपताच बंद करण्यात आली .
महोदय हि जनतेचा रोजी रोटी चा प्रश्न्न आहे .आगोदरच महागाई ने लोकांचे कंबरडे मोडले आहे .त्यावर मुंबई नजीक राहून पण जाणे येणे च्या प्रश्न कडे असे दुर्लक्ष झाले तर लोकांची मराची पाडी आल्याशिवाय राहणार नाही .
त्यामुडे आपणास नम्र विनंती आहे कि आपण सदर विषयी वरिष्ठ पातडीवर योग्य त्या विभागाशी चर्चा करावी व लवकरात लवकर सदर जनतेची मागणी म्हणजेच दिवा - वसई गाडी सकाळी ९ वाजता च्या दरम्यान सुरु करावी हीच नम्र विनंती .... महोदय हा जनतेचा ,रोजगार वर्गाचा , कामगार ,श्रमिक ,नोकरदार अश्या सर्वच वर्गाचा उदर निर्वाह चा /भरणं पोषणाचा / जीवन मरणाचा / जिव्हांड्याचा प्रश्न आहे . त्यामुडे आपण लवकरात लवकर हि मागणी मार्गी लावेल हीच अपेक्षा ......

धन्यवाद .
आपला विश्वासू
कल्याण दिवा वसई प्रवास करणारे आपली जनता .
Complaint Against / To: central railway board

Share Now Ask Question Reply Now Contact Submit Complaint

Related complaints

Complaints

    Service issue | Complaint | Query | Feedback | Suggestion | Reply

    eConsumer Court (Online Upbhokta Forum) take the complaint directly to the escalation team of the company, which has the power to resolve your grievance. We send a well-drafted letter to the company, explaining the details of your complaint along with the inconvenience caused to you. Jago Grahak Jago is specially to help consumers to redress their issues and grievances. We ensure to take quick actions on every complaint filed by the customers. We work hard and tirelessly to resolve the case.